राजा सुहेलदेव हा एक अभिमानी भारतीय होता, सर्वात क्रूर अशा परकी आक्रमकांसमोर आपली भूमी थरकापत होती, अशा वेळी भारतमातेच्या रक्षणासाठी तो उभा ठाकला. त्याने सर्वांना-सर्व जातींचे हिंदू, बौद्ध आणि भारतीय मुस्लिम यांना-त्याच्या नेतृत्वाखाली एकत्र आणलं. ते त्यांच्या मातृभूमीसाठी लढले. आणि त्यांनी एक देदीप्यमान विजय मिळवला. हा विचारच फार उत्तेजित करणारा आहे, पण या भारताच्या सुपुत्राकडून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे: आपण जेव्हा भारतीय म्हणून एकत्र येतो, तेव्हा आपण अजिंक्य असतो. माझी देशभक्ती आणि भारतमातेबद्दलचं माझं प्रेम मला ही कथा सांगायला भाग पाडतात. पण त्याचं आणखीही एक कारण आहे. जाती-समाजाबद्दलचे दावे काहीही असोत, पण राजा सुहेलदेव शिवभक्त होता ही गोष्ट सर्वमान्य आहे.